जलील यांच्या विरोधात मोर्चाला परवानगी नाहीच; मनसे मात्र ठाम

जलील यांच्या विरोधात मोर्चाला परवानगी नाहीच; मनसे मात्र ठाम

| Updated on: Mar 15, 2023 | 11:04 AM

मनसेकडून छत्रपती संभाजी नगरच्या समर्थनार्थ तर खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात मोर्चा काढणार आहे

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर एमआयएमने विरोध केला. आधी साखळी आंदोलन त्यानंतर कॅन्डल मार्च काढत नामांतराला एमआयएमने कडाडून विरोध केला. याला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्यावर उतरली आहे. मनसेकडून छत्रपती संभाजी नगरच्या समर्थनार्थ तर खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात मोर्चा काढणार आहे. त्याला अजूनही पोलीस प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. मात्र मोर्चा काढण्यावर मनसे ठाम आहे. 16 मार्चला सकाळी 11 वाजता मनसेचा मोर्चा निघणार आहे. संस्थान गणपती ते विभागीय आयुक्त कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असेल.

Published on: Mar 15, 2023 11:04 AM