SC ने औरंगाबाद नामांतराच्या विरोधाची याचिका फेटाळली
नामांतरण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण होते. आधी नामांतराच्या विरोधात एमआयएमने आंदोलन केलं. त्यानंतर साखळी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा खासदार इम्तियाज जलिल यांनी केली. तसेच आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ असे म्हणाले होते. याच दरम्यान नामांतरण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. ही सुनावणी डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांच्या खंडपीठासमोर झाली. या सुनावणीकडं छत्रपती संभाजीनगरसह संपुर्ण राज्याचे लक्ष हे या सुनावणीकडे लागले होते.
Published on: Mar 24, 2023 02:20 PM
Latest Videos