औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर झालं, कुणाचा आक्षेप? कुणाचं समर्थन? पाहा…
Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबादचं नामांतर करून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं. या नामांतरवर 69 हजार पेक्षा अधिक हरकती दाखल झाल्या आहेत. उस्मानाबादच्या नामांतरवरही अर्ज दाखल आहेत. पाहा व्हीडिओ...
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचं नामांतर करून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं. या नामांतरवर 69 हजार पेक्षा अधिक हरकती दाखल झाल्या आहेत. तर उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्यात आलं. या नामांतरावरून 19 हजार अर्ज दाखल आहेत. आक्षेप नोंदवण्याची 27 मार्च पर्यंत शेवटची मुदत आहे. छत्रपती संभाजी नगरच्या नामांतरावरून तब्बल 69 हजारांच्या जवळपास आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. तर छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ शिवसेनेकडून 30 हजार पोस्ट कार्ड पाठवले जाणार आहेत. सूचना, हरकतींचा विभागीय आयुक्त कार्यालयात अक्षरशः खच पडला आहे. हरकती दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Published on: Mar 23, 2023 12:21 PM
Latest Videos