मोठी बातमी! ‘औरंगबादऐवजी ऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही’ राज्य सरकारची हमी
औरंगाबाद नामांतरासंदर्भात याचिकेवर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीत औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नसल्याची हमी राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे.
मुंबई: औरंगाबाद नामांतरासंदर्भात याचिकेवर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीत औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नसल्याची हमी राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे. या याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाहीत, अशी आशा हायकोर्टाने व्यक्त केली होती. दरम्यान, राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराच्या नामांतराचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात नामांतराविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील अंतिम सुनावणी अजून झाली नाही.
Published on: Jun 29, 2023 12:33 PM
Latest Videos