मंत्री संदिपान भुमरे यांनी विमानात लुटला चटणी भाकरीचा आनंद; व्हीडिओची सोशल मीडियावर चर्चा
राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी औरंगाबाद ते मुंबई या विमान प्रवासा दरम्यान चटणी भाकरीचा आनंद लुटला. पाहा व्हीडिओ...
औरंगाबाद : औरंगाबादचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी औरंगाबाद ते मुंबई असा विमानातून प्रवास केला. हा प्रवास करत असताना विमानात त्यांनी चटणी भाकरीचा आनंद घेतला. विमानातील हायफाय जेवण एका बाजूला आणि चटणी भाकरी एका बाजूला…, असं म्हणत त्यांनी मांडी घालत पारंपरिक जेवणाचा आनंद लुटला. त्यांनी विमानातील इतर पदार्थांना महत्व न देता त्यांनी घरून आणलेला चटणी भाकरीचा आस्वाद घेतला आहे. संदिपान भुमरे यांचे जेवतानाचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
Latest Videos