Akbaruddin Owaisi Aurangabad Sabha | 'मी मुस्लिमांच्या हिताचं बोलत होतो आणि बोलणारच'

Akbaruddin Owaisi Aurangabad Sabha | ‘मी मुस्लिमांच्या हिताचं बोलत होतो आणि बोलणारच’

| Updated on: May 12, 2022 | 7:33 PM

या देशाची प्रगती तेव्हाच होते, जेव्हा येथील प्रत्येक नागरिकाला आपण देशाच्या प्रगतीचा वाटेकरी आहोत, अशी जाणीव होईल…मुस्लीम मुलांना नेशन बिल्डिंग प्रक्रियेचा भाग बनवण्यासाठीच मी इथे आलो आहे, असं वक्तव्य अकबरुद्दीन ओवैसीं यांनी केलं.

औरंगाबादः एरवी आक्रमक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगाबादेतल्या (Aurangabad) भाषणाच्या सुरुवातीलाच सर्वधर्मसमभावाची भाषा केली. तसेच देशात सगळ्यात मागसलेला समाज हा मुस्लिम समाज असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच त्यांनी मी ‘मी मुस्लिमांच्या हिताचं बोलत होतो आणि बोलणारच’ असेही म्हटले आहे. त्याचबरोबर देश फक्त एकाच धर्माच्या लोकांनी तयार होत नाही तर त्यात सर्व धर्माचे लोक असतात. सर्वांची प्रगती झाली तरच भारत सुपर पॉवर म्हणून जगात उभा राहील, असं वक्तव्य अकबरुद्दीन ओवैसी यांनी केलं. नेशन बनता है हिंदूसे, नेशन बनता है मुसलमानोंसे, सिखोसे, पारसीओंचे.. असं वक्तव्य आज अकबरुद्दीन औवैसी यांनी केलं. तेलंगणा येथील सालार ए मिल्लत एज्युकेशन ट्रस्टच्या (Education trust) वतीने गरीबांच्या मुलांसाठी औरंगाबादमध्ये शाळा उघडण्यात येणार आहे. या शाळेच्या भूमीपूजन कार्यक्रमाला आज अकबरुद्दीन ओवैसी यांनी उपस्थिती लावली. यावेळच्या भाषणात ते बोलत होते.

Published on: May 12, 2022 07:33 PM