मोठा अनर्थ टळला! औरंगाबाद-जळगाव महामार्गावर रस्त्यावरच बसमध्ये अग्नितांडव, थरारक घटना
भीषण आगीत एसटीचा बसचा कोळसा झाला.
औरंगाबाद : औरंगाबाद जळगाव हायवेवर एसटी बसला अचानक आग लागली. या भीषण आगीत एसटी बसचा कोळसा झाला. प्रसंगावधान राखत या वेळी प्रवाशांना बस चालक आणि वाहकानं खाली उतरवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. एसटी बसच्या ड्रायव्हर केबिनमध्ये आधी आग लागल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तातडीनं चालक आणि वाहकानं प्रवाशांना गाडीतून खाली उतरवलं. त्यामुळे प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला. मात्र या आगीत बस पूर्ण पणे जळून खाक झाली आहे. रस्त्याच्या मधोमधच एसटीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालंय.
Published on: Apr 25, 2022 07:36 AM
Latest Videos