VIDEO | औरंग्याचे फोटो झळकवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करत हिंदुत्ववादी संघटनांकडून ‘येथे’ बंदची हाक
स्टेटस ठेण्याचे हे लोन आता ग्रामिनभागातही पसरल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसात अहमदनगर संगमनेर, सोलापूर, बीडमधील आष्टी यासह अनेक ठिकाणी हे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. यामधील अहमदनगरमधील संगमनेर आणि कोल्हापुरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून हिंदुत्त्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या.
अहमदनगर : औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचं कथितरित्या उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेण्याचे प्रकार वाढले आहेत. आधी हे प्रकार शहार दिसत होते. स्टेटस ठेण्याचे हे लोन आता ग्रामिनभागातही पसरल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसात अहमदनगर संगमनेर, सोलापूर, बीडमधील आष्टी यासह अनेक ठिकाणी हे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. यामधील अहमदनगरमधील संगमनेर आणि कोल्हापुरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून हिंदुत्त्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. तर अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली होती. आता अहमदनगरमधील भिंगार गावात बंदची हाक देण्यात आलीये. कारण एकच औरंगजेबाचे फोटो मिरवणं आणि औरंगजेबाचे टेटस ठेवणं. नगर शहरालगत असलेल्या भिंगार गावात सकाळपासून शांततेत बंद पाळला जात असून शंभर टक्के दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन सह शहरातील पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. मागील आठवड्याभरापासून अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये औरंगजेबाच्या उदित्तीकरणाचा प्रकार घडत आहे. या घटनांचा निषेध करत लव्ह जिहाद सारख्या प्रकारावर कडक कायदा करावा अशी मागणी भिंगार येथील हिंदुत्ववादी संघटनांनी केली असून एक दिवस भिंगारगाव बंद ठेवण्याची हाक दिली आहे.