Amravati News : अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
Amravati Police On Action Mode : नागपूरमध्ये झालेल्या जाळपोळ घटनेनंतर आता अमरावती शहरात देखील खबरदारी म्हणून पोलिसांनी संवेदनशील भागात पहिलेच बंदोबस्त तैनात केलेला बघायला मिळत आहे.
औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून राज्यात वातावरण तापलेल आहे. यातच नागपूरमध्ये काल झालेल्या हिंसचारानंतर अमरावतीमध्ये देखील आता पोलिस अॅक्शन मोडवर आलेले आहेत. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद रेड्डी यांनी काल या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातल्या काही भागांची पाहणी देखील केली होती. त्यानंतर आज शहरातल्या सगळ्या संवेदनशील भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. आमरावतीच्या चित्रा चौक परिसरात राज्य राखीव दलाचे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहे. कोणताही अनुचित प्रकार शहरात घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्व खबरदारी याठिकाणी घेतली जात आहे.
Published on: Mar 18, 2025 06:23 PM
Latest Videos