गोष्ट आयाराम गयाराम शब्दाची…
भाजपचा मातृपक्ष जनता दल आणि काही छोटे पक्ष. काँग्रेस नेते गयालाल यांना अनंतपूरमधून विधानसभेची उमेदवारी मिळेल अशी आशा होती पण ऐनवेळी निर्णय बदलला गेला, आणि त्यांनी पक्षांतर करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून मग आयाराम गयाराम हा शब्द प्रचलित झाला.
विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात बंडखोरी नाट्य घडले आणि बंडखोरीविषयी जोरदार चर्चा चालू झाली. यामध्ये एका शब्द कायम घेतला जाऊ लागला तो म्हणजे आयाराम आणि गयाराम. राजकारणात हा शब्द आला कुठून आणि तो कधीपासून आला याची एक वेगळीच कथा आहे. राज्यात शिवसेना नेमकी कुणाची हा वाद सुरु असतानाच आता आयाराम गयारामांची जोरदार चर्चा चालू झाल्याने या शब्दाची उकल मात्र मजेशीर आहे. 1968 मध्ये एका नेत्याने काँग्रेसच्या दिवसभरात तब्बल दोनदा पक्ष बदलला आणि पंधरा दिवसात चार वेळेस पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये सामील झाला.1 नोव्हेंबर 1966 ला पंजाब पासून हरियाणा वेगळं झालं, त्यानंतर लगेच1968 ला विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळी काँग्रेस पक्ष सर्वात प्रबळ पक्ष होता. तर त्यांचा विरोधक होता युनायटेड फ्रंट म्हणजेच आजच्या भाजपचा मातृपक्ष जनता दल आणि काही छोटे पक्ष. काँग्रेस नेते गयालाल यांना अनंतपूरमधून विधानसभेची उमेदवारी मिळेल अशी आशा होती पण ऐनवेळी निर्णय बदलला गेला, आणि त्यांनी पक्षांतर करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून मग आयाराम गयाराम हा शब्द प्रचलित झाला.