राम मंदिराच्या उभारणीत राज्याचा हातभार, सागवानी काष्ट यावर फडणवीस म्हणाले…
आपल्या महाराष्ट्रातील गडचिरोली आणि चंद्रपुरातील जंगलातील सागवाण लाकूड अयोध्येतील राममंदिरासाठी काष्ट देतोय ही बाब खूप महत्वाची असल्याचेही फडणवीस म्हणाले.
नागपूर : आयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहासाठी मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाचा वापर होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील आलापल्लीच्या जंगलातील सागवानाची निवड झाली. महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वनविकास महामंडळाला हे सागवान पुरवण्यासाठी श्रीराममंदिर ट्रस्टने विनंती केली. यानंतर आलापल्लीच्या जंगलातील अतिशय उत्कृष्ट सागवान राममंदिरासाठी निवडले. यासाठी चंद्रपुरातून सागवान लाकडाची पहिली खेप रवाना झाली. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी फडणवीस यांनी श्रीराममंदिरासाठी लागणारे सागवाणी काष्ट हे महाराष्ट्रातून जाणे हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्रातील गडचिरोली आणि चंद्रपुरातील जंगलातील सागवाण लाकूड अयोध्येतील राममंदिरासाठी काष्ट देतोय ही बाब खूप महत्वाची असल्याचेही फडणवीस म्हणाले.