नाराजी नाही, उलट तुमचेच आमदार, खासदार आमच्या संपर्कात; राऊतांना शिवसेनेच्या नेत्याने डिवचलं
3 आमदार आणि 1 खासदार या चौघांच्या अनुपस्थितीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला. तर शिंदे गटात नाराजी, अस्वस्थता, काहीतरी गडबड असल्याचं राऊत यांनी सांगितलं
वाशिम : शिंदेच्या अयोध्या दौर्यावर 3 आमदार आणि 1 खासदार गेले नव्हते. या चौघांच्या अनुपस्थितीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला. तर शिंदे गटात नाराजी, अस्वस्थता, काहीतरी गडबड असल्याचं राऊत यांनी सांगितलं. त्यावर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी चोख उत्तर दिलं आहे. त्यांनी, मी याच्याआधी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री याच्या सोबत गेले होते. पण आता जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे राऊत हे पारावरच्या गप्पा मारत आहेत. त्या मारणं बंद करावं. शिंदे गटात नाराजी, अस्वस्थता, काहीतरी गडबड असं काही नाही. उलट ठाकरे गटातील आमदार, खासदार आमच्या संपर्कात असून लवकर आमच्या ते शिवसेनेत येणार असल्याचा दावा खासदार गवळी यांनी केला.
Published on: Apr 10, 2023 03:24 PM
Latest Videos