Hathras Stampede : चेंगराचेंगरीत चिमुकल्यांसह म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, टाहो आणि आक्रोश; सत्संगात नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ते स्वत: घटनास्थळी पोहचले आहे. या घटनेतील जखमींना प्रत्येकी 50 हजार रूपयांची मदत करण्यात आली आहे. तर चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भोलेबाबा फरार झाला.
उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. हाथरस शहरापासून 40 किमी अंतरावर असलेल्या फुलराई गावात साकार विश्व हरि भोले बाबा यांच्या सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली. या सत्संगासाठी जवळपास सव्वा लाख भाविक दाखल झाले होते याच कार्यक्रमानंतर चेंगराचेंगरीचा प्रकार घडला आणि 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. भोलेबाबा नावाच्या गुरूंच्या सत्संगासाठी लाखो लोकं जमले होते. माहितीनुसार 50 हजारांपेक्षा जास्त भाविकांना एकाच जागी थांबवण्यात आलं होतं. आतमध्ये सत्संग सुरू होता तर बाहेर हजारो लोक थांबले होते. भोलेबाबाचं दर्शन व्हावं म्हणून अनुयायी बऱ्याच वेळ तात्कळत होते. मात्र सत्संग आटोपून भोलेबाबांच्या वाहनांचा ताफा थांबवलेल्या अनुयायांसमोरून गेला तेव्हा लोक भोलेबाबाच्या दिशेने धावले आणि त्यानंतर भीषण चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली.