“अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने चूक केली? पाहा राष्ट्रवादीचा नेता काय म्हणाला…
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या दावा केला आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार संपर्कात आहेत, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे आता राष्ट्रवादी कोणाची असा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती.
परभणी: रविवारी अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप घडवून आणला. अजित पवार यांनी 30 आमदारांसह राष्ट्रवादीत बंड केला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या दावा केला आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार संपर्कात आहेत, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे आता राष्ट्रवादी कोणाची असा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय गव्हाणे, खासदार फौजिया खान, विजय गव्हाणे यांच्यासह बहुतांश पदाधिकारी शरद पवार उपस्थित होते. यावेळी बाबाजानी दुर्राणी यांनी महत्वपुर्ण वक्तव्य केलं आहे. ते नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…