तुम्ही शेळी, कुत्रे, मेंढी झालात, तुम्हाला बोलायचा अधिकार नाही; सावंत आणि राऊत यांचा शिवसेना नेत्याकडून समाचार

तुम्ही शेळी, कुत्रे, मेंढी झालात, तुम्हाला बोलायचा अधिकार नाही; सावंत आणि राऊत यांचा शिवसेना नेत्याकडून समाचार

| Updated on: Apr 13, 2023 | 12:05 PM

सावंत आणि राऊत यांच्यावर टीका करताना संजय गायकवाड म्हणाले, ‘महाराष्ट्रातले खरे वाघ कोण? कोल्हे, कुत्रे, लांडगे कोण आहेत? हे महाराष्ट्रातील जनता जानते. आम्ही गेली 35 वर्षे वाघासारखे जगलो

बुलढाणा : बाबरी मशीदवरून भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली होती. खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर निशाना साधत टीका केली होती. त्यावर आता शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी प्रतिहल्ला चढवत टीका केली आहे.
सावंत आणि राऊत यांच्यावर टीका करताना संजय गायकवाड म्हणाले, ‘महाराष्ट्रातले खरे वाघ कोण? कोल्हे, कुत्रे, लांडगे कोण आहेत? हे महाराष्ट्रातील जनता जानते. आम्ही गेली 35 वर्षे वाघासारखे जगलो. खऱ्या अर्थाने ज्यांचा शिवसेनेशी संबंध आला नाही, तेच लोक आता वाघाचे पांघरून बसलेत. आम्ही कुठेही गेलो नाहीत. गेले ते शेळ्या मेंढ्यांच्या कळपात. आमचा वाघाचा कळप स्वतंत्र आहे. आम्ही कोण्या कळपात गेलो नाही. अरविंद सावंत, राऊत असतील हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या कळपात जाऊन तुमचा वाघ विसरले. तुम्ही शेळी, कुत्रे, मेंढी झालात, तुम्हाला बोलायचा अधिकार नाही, अशा शब्दात संजय गायकवाड यांनी सुनावलंय.

Published on: Apr 13, 2023 11:39 AM