हिंमत असेल तर आता मारा जोडे आणि द्या राजीनामे; ठाकरे गटाच्या नेत्याचे शिंदेंना आव्हान
चंद्रकांत पाटलांवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हल्ले सुरूच आहेत. तर शिंदे गटाचा देखिल समाचार घेतला जात आहे. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर निशाना साधत टीका केली आहे.
अमरावती : बाबरी मशीद पडली तेव्हा शिवसेनाचा काहीही संबंध नव्हता, असे वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावरून आता टीका होत आहे. तर पाटील यांनी दिलगिरीही व्यक्त केली असून अमित शाह यांनी ताकीद दिली आहे. याचदरम्यान चंद्रकांत पाटलांवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हल्ले सुरूच आहेत. तर शिंदे गटाचा देखिल समाचार घेतला जात आहे. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर निशाना साधत टीका केली आहे. त्यांनी, तुमच्या सोबतचा एक माणूस बाळासाहेबांचा अपमान करतो, मग आता कोणाला जोडे माराल? बाळासाहेबांची शिवसेना, आम्ही बाळासाहेबांचे विचार अस म्हणता तुमच्यासोबतचा माणूस चक्क बाळासाहेबांचा अपमान करतो, हिम्मत असेल आणि स्वाभिमान असेल तर द्या राजीनामे. लांडग्यानी वाघाचे पाघरून घातले तर वाघ होत नाही अशी टीका त्यांनी शिंदे गटाच्या आमदारावर केली.