Ambadas Danve : मोदी आणि अमित शहा यांचे तळवे चाटण्यापेक्षा; चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर दानवेंच प्रत्युत्तर
अंबादास दानवे यांनी, मोदी आणि शहा यांचे पाय दळवे दिल्लीला जाऊन चाटण्यापेक्षा आम्ही येथे शरद पवार यांच्याबरोबर स्वाभिमानाने चर्चा केली यात काय वाईट आहे असा सवाल केला आहे
मुंबई : बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसैनिकांच्या तुकड्या गेल्या नाहीत”, असं भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील बोलले आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत पाटलांसह भाजपवर तुटून पडले. उद्धव ठाकरे यांनी बाबरीच्या खंदकातून अनेक उंदीर बाहेर पडत असल्याचं म्हटलं. तर संजय राऊत यांनी, चंद्रकांत पाटलांच्या ढूंगणावर लात मारून त्यांना मंत्रीमंडळातून हाकलून द्या असे म्हटलं आहे. त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील टीका केली आहे. त्यांनी, मोदी आणि शहा यांचे पाय दळवे दिल्लीला जाऊन चाटण्यापेक्षा आम्ही येथे शरद पवार यांच्याबरोबर स्वाभिमानाने चर्चा केली यात काय वाईट आहे असा सवाल केला आहे. तर शिवसेनेचे महत्त्व, शिवसेना प्रमुखाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचेही ते म्हणाले. तर जे लोक दिल्लीत जाऊन, दिल्लीला विचारल्याशिवाय पाण्याचा घोट सुद्धा पीत नाही, त्या लोकांनी उद्धवजी ठाकरे शरद पवारांच्या भेटीवर बोलू नये असेही दावने म्हणालेत.