नवनीत राणा यांच्या मतदारसंघावर बच्चू कडू यांचा दावा, म्हणाले, “अमरावतीवर आमचा…”!
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.कारण अमरावती लोकसभा मतदारसंघावर आमदार बच्चू कडू यांनी दावा सांगितला आहे. "आम्हीही विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत.काल आमची मिटिंग झाली.
नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.कारण अमरावती लोकसभा मतदारसंघावर आमदार बच्चू कडू यांनी दावा सांगितला आहे. “आम्हीही विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. काल आमची मिटिंग झाली. विधानसभेच्या 15 ते 20 जागा लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. लोकसभेची एक जागा लढवणार आहे. सर्व पक्ष सत्तेत आहेत. घटक पक्ष म्हणून कसे सामोरे जाता येईल हे पाहू. युतीची शक्यता आहे. एकत्र लढण्याची आमची तयारी आहे. पण नाहीच काही ताळमेळ झाला तर स्वतंत्रपणे लढू”, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.”तसेच भाजप, शिवसेनेच्या महायुतीत आम्ही अमरावती लोकसभा मतदारसंघाची मागणी करणार आहोत. या मतदारसंघावर आम्ही फोकस केला आहे. ही जागा आम्ही सोडणार नाही. या मतदारसंघात कुणाशीही फाईट झाली तरी आम्ही लढू”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.