कडू असलो तरी, उद्धव ठाकरे यांना गोड..., बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना कोणता सल्ला दिला?

“कडू असलो तरी, उद्धव ठाकरे यांना गोड…”, बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना कोणता सल्ला दिला?

| Updated on: Jul 27, 2023 | 7:07 AM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल एक प्रखर मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 27 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल एक प्रखर मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. एनडीएमध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. याच पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मी कडू जरी असलो तरी त्यांना गोड सल्ला देतो. आजच्या दिवशी आपण चांगलं गोड बोलावं. आम्ही सुद्धा तुम्हाला गोड शुभेच्छा देतो. राज्याच्या राजकारणात काय होईल ते काहीच सांगता येत नाही. आपल्याला माहीत आहे कशापद्धतीने राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे इंडियावाले एनडीत येऊ शकतात किंवा एनडीए इंडियात जाऊ शकतं.” तसेच “डब्बा कशाचाही असूद्या, आहे ना काहीतरी, त्या डाल्ड्यामध्येही आम्ही काही चांगलं करु ना. डब्बा जरी डाल्डाचा असला तरी त्यामध्ये आम्ही खिचडी पकवू ना. तुम्ही त्याची चिंता करु नका,” असं प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी दिलं.

Published on: Jul 27, 2023 07:07 AM