बच्चू कडू यांची मंत्रिपदाची मागणी पूर्ण होईना, आता म्हणतात किमान पालकमंत्री तरी द्या!
आमदार बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. कडू यांनी राज्यातील जिल्ह्यात प्रत्येकी एक पालकमंत्री देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'मंत्रिमंडळ विस्तार गरजेचा आहे. कुणी नाराज होईल या माध्यमातून विस्तार थांबत असेल तर चुकीचं आहे.
अमरावती : आमदार बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. कडू यांनी राज्यातील जिल्ह्यात प्रत्येकी एक पालकमंत्री देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘मंत्रिमंडळ विस्तार गरजेचा आहे. कुणी नाराज होईल या माध्यमातून विस्तार थांबत असेल तर चुकीचं आहे. सरकार हे जनतेच्या सेवेसाठी आहे. एखाद्याकडे आठ-आठ जिल्हे आणि पालकमंत्री म्हणून पाहत असेल आणि आठ-आठ खाते सांभाळत राहत असेल तर ते योग्य नाही आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येकी एक पालकमंत्री द्या’, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आह. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतीत बच्चू कडू यांची अनेक विधानं चर्चेत आली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना स्थान मिळेल की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
Published on: May 18, 2023 05:01 PM
Latest Videos