‘ऐकून घे आधी, शांत बस!’, म्हणत बच्चू कडूंनी स्थानिकाच्या कानशिलात लगावली
आमदार बच्चू कडू यांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात बच्चू कडू एका व्यक्तीला कानाखाली मारताना दिसत आहेत.
अमरावती : आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ‘ऐकून घे आधी, शांत बस!’, असं म्हणत बच्चू कडू एका व्यक्तीला कानाखाली मारताना दिसत आहेत. अमरावती जिल्ह्यातील गणोजा गावातील ही घटना आहे.गावातील विकास कामाच्या मुद्यावरुन वाद झाला. तेव्हा बच्चू कडू यांनी या व्यक्तीच्या कानशिलात लगावली. ही व्यक्ती प्रहारचा कार्यकर्ता असल्याची सोशल मीडियावर चर्चा होती. त्याविषयी टीव्ही 9 मराठीशी बोलताना कडू (Bacchu Kadu Viral Video) यांनी माहिती दिली. तो कार्यकर्ता नसून तिथला स्थानिक रहिवासी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Published on: Sep 28, 2022 10:54 AM
Latest Videos