Special Report | बच्चू कडू मंत्रिपदासाठी शेवटच्या पंगतीत?-TV9
काहीच दिवसात बच्चू कडू सूरतला पोहोचले.. ज्यावेळी आमदार सूरतला जात होते...त्याचवेळी दीपक केसरकर, संजय राठोड, दादा भुसे आणि गुलाबराव पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंशी वाटाघाटी करत होते.
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर 24 तासाच्या आत आलेली बच्चू कडूंची ही प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे…बच्चू कडूंच्या मनातली नाराजी त्यांच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसतेय. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार तब्बल 40 दिवसांनी झाला. आणि त्यातही नाव न आल्यानं बच्चू कडू प्रचंड नाराज झाले आहेत. बंडात उशिरा सहभागी झालेल्यांना मंत्रिमंडळात पहिल्यांदा स्थान देण्यात आल्याचा बच्चू कडूंचा आरोप आहे. आता मुंबईतून सुरतला आणि सुरतहून गुवाहाटीला कोण कधी गेलं..तेही बघा..मुंबईहून आमदारांची पहिली खेप सूरतला गेली. यात एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, शहाजीबापू पाटील, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांचा समावेश होता. हे आमदार जेव्हा सूरतला गेले…त्य़ानंतर बच्चू कड़ूही नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर काहीच दिवसात बच्चू कडू सूरतला पोहोचले.. ज्यावेळी आमदार सूरतला जात होते…त्याचवेळी दीपक केसरकर, संजय राठोड, दादा भुसे आणि गुलाबराव पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंशी वाटाघाटी करत होते.