Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कॅबिनेटमध्ये स्थान न मिळाल्यानं नाराजी?

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कॅबिनेटमध्ये स्थान न मिळाल्यानं नाराजी?

| Updated on: Aug 10, 2022 | 10:31 AM

आमदार बच्चू कडू कॅबिनेटमध्ये स्थान न मिळाल्यानं नाराज असल्याची चर्चा आहे. बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यामुळे चर्चेला विधान आलंय.

मुंबई : आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीला पोहोचले आहेत. काल एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यानं अनेक आमदार नाराज आहे. तर अनेकांची नाराजी असल्याची चर्चा देखील आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं बोललं जातंय. तर आमदार बच्चू कडू यांची कॅबिनेटमध्ये स्थान न मिळाल्यानं नाराज असल्याची चर्चा आहे. बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी पोहोचले आहेत. दरम्यान, विकासकामांसदर्भात, मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू गेल्याची माहिती सध्या मिळत आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रीपद न मिळाल्यानं नाराजी वाढत असल्याचं दिसत आहे.

 

Published on: Aug 10, 2022 10:29 AM