भाजपसोबत जाऊन चुकी झाली? बच्चू कडू स्पष्टच बोलले,  ...तेव्हा चूक दुरुस्त करू

भाजपसोबत जाऊन चुकी झाली? बच्चू कडू स्पष्टच बोलले, “…तेव्हा चूक दुरुस्त करू”

| Updated on: Jul 07, 2023 | 8:27 AM

अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.

अमरावती: अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. “राष्ट्रवादीवर टीका करत अनेक आमदार शिवसेनेमधून बाहेर पडले होते. आता विचारात न घेता राष्ट्रवादीला सत्तेत घेतलं याचा परिणाम शिंदे गटातील 40 आमदारांवर होणार आहे. त्या 40 लोकांनी मतदारांना आता काय उत्तर द्यायचं? पहिल्याला मारायचा आणि दुसऱ्याला हाती घ्यायचं. दुसऱ्याला मारायचा तिसऱ्याला हाती घ्यायचं. ही जी काही भूमिका आहे, हे थांबलं पाहिजे. भाजपसोबत जाऊन चुकी झाल्याचं म्हणून काय फायदा आहे. एकदा चुकलेल्या माणसाला दुरुस्त करता येतं चूक वाटून घेण्यात काही अर्थ नसतो. आता दुरुस्त करावं लागेल जेव्हा वेळ येईल तेव्हा दुरुस्त करू.मी मंत्रिपदासाठी थोडी बोलत आहे. एकंदरीत या व्यवस्थेमध्ये कोण कसं अडचणीत येत आहे. ते मी सांगत आहे. शेवटी काही मर्यादा असतात. किती वेळ थांबायचं, किती वेळ सहन करायचं याच्याही काही मर्यादा आहेत. जर मर्यादा तुटल्या तर कोणीच कुणाच नसतं,” असं बच्चू कडू म्हणाले.

 

Published on: Jul 07, 2023 08:27 AM