एका भाकरीवर ताव मारून काय होणार? दुसरी भाकर तयार, बच्चू कडू यांना नेमकं म्हणायचंय काय?

“एका भाकरीवर ताव मारून काय होणार? दुसरी भाकर तयार”, बच्चू कडू यांना नेमकं म्हणायचंय काय?

| Updated on: Jul 05, 2023 | 7:35 AM

अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. या युतीमुळे शिंदे गट अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. आमच्या वाट्याला पूर्ण भाकर येणार होती. आता त्यातील हिस्सा हा अजित पवार गटाने नेला. असं शिंदे गटातील नेत्यांना वाटते. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी मोठं विधान केलंय.

मुंबई : अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. या युतीमुळे शिंदे गट अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. आमच्या वाट्याला पूर्ण भाकर येणार होती. आता त्यातील हिस्सा हा अजित पवार गटाने नेला. असं शिंदे गटातील नेत्यांना वाटते. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी मोठं विधान केलंय. “दुसरी भाकर टाकू. एका भाकरीवर ताव मारून काय होणार. दुसरी भाकर तयार आहे,” असं बच्चू कडू यांनी म्हटलं. तसेच अजित पवार यांच्या बंडावरही बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “वरिष्ठ नेत्यांविरोधात कनिष्ठ नेत्यांनी केलेला उठाव आहे. नवीन पिक्चर सुरू झाला आहे. उठाव करणे हा काही दोष नाही. ज्याच्यात दम असतो तो बाहेर येतो. यात हिरो आणि विलन कोणी नसतो. हे पिक्चरसारखं असतं, असं लोकांना वाटतं. यात सर्व हिरोच असतात. काही लोकं हरतात आणि काही लोकं जिंकतात.”

Published on: Jul 05, 2023 07:35 AM