सचिन तेंडुलकर यांच्या ‘त्या’ जाहिरातीवर बच्चू कडू यांचा आक्षेप; म्हणाले, “हे चुकीचं…”
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमच्या जाहिरातीतून वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. संचिन तेंडुलकर यांनी अशी जाहिरात केल्यामुळे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
नागपूर, 5 ऑगस्ट 2023 | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमच्या जाहिरातीतून वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. संचिन तेंडुलकर यांनी अशी जाहिरात केल्यामुळे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमची जाहिरात केली आहे. सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. भारतरत्न असलेल्या व्यक्तीने ऑनलाईन गेमला प्रोत्साहन देणं योग्य नाही. हे चुकीचं आहे. त्यामुळे सचिन यांना नोटीस पाठवून त्यांना जाब विचारला जावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published on: Aug 05, 2023 10:19 AM
Latest Videos