'राष्ट्रात मोदी, राज्यात शिंदे' जाहिरातीवर बच्चू कडू म्हणतात, आम्हाला सत्तेत राहून...

‘राष्ट्रात मोदी, राज्यात शिंदे’ जाहिरातीवर बच्चू कडू म्हणतात, “आम्हाला सत्तेत राहून…”

| Updated on: Jun 14, 2023 | 11:12 AM

काही वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या शिवसेनेच्या जाहिरातीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या जाहिरातीत देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख करण्यात आला आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा होत होती. मात्र शिवसेनेच्या जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या जाहिरातीमुळे भाजपमध्ये नाराजी असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमरावती : काही वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या शिवसेनेच्या जाहिरातीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या जाहिरातीत देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख करण्यात आला आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा होत होती. मात्र शिवसेनेच्या जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या जाहिरातीमुळे भाजपमध्ये नाराजी असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नाराज असल्याची चर्चा या लोकलच्या चर्चा आहे. नेत्यांमध्ये कधी मिठाचा खडा पडत नाही. कारण आम्हाला सत्तेत राहून काम करायचं असतं. आजपर्यंतच्या इतिहासातील पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांच्या घरी रात्री 12 ही वाजता सामान्य माणसांची गर्दी असते. आधी वर्षा बंगल्यावर आम्हालाच एन्ट्री नव्हती पण आज तिथे सामान्य माणसांची गर्दी आहे, त्यामुळे त्यांची ही लोकप्रियता वाढत आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

Published on: Jun 14, 2023 11:11 AM