रवी राणा-बच्चू कडू वाद पेटला की मिटला? बच्चू कडूंचं वक्तव्य पाहा Video

रवी राणा-बच्चू कडू वाद पेटला की मिटला? बच्चू कडूंचं वक्तव्य पाहा Video

| Updated on: Nov 03, 2022 | 3:51 PM

रवी राणांनी जी वक्तव्य केली त्याला मी प्रत्युत्तर दिलं एवढंच... अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

मुंबईः भाजप आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर आता तो शमण्याची चिन्ह आहेत. बच्चू कडू यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या कार्यालयात भेट दिली. यावेळी ते म्हणाले, माझा आणि रवी राणांचा वाद कधी पेटलाच नव्हता. तो पेटलाही नाही आणि जो पेटला होता तो मिटलाय. मग कोथळा काढण्याची भाषा का केली, असा सवाल केला असता, राजकारणात (Maharashtra Politics)अशी भाषा काही मी एकटाच करत नाही. तुम्ही इतिहास काढून पाहिला असता अनेकजण अशी भाषा करतात. त्यामुळे तो फार गंभीरतेने घेतला नाही पाहिजे. रवी राणांनी जी वक्तव्य केली त्याला मी प्रत्युत्तर दिलं एवढंच… अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

Published on: Nov 03, 2022 03:51 PM