मंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतरही बच्चू कडू यांचं मोठं विधान; म्हणाले, “त्यादिवशी मी अमेरिकेत…”
बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी मोठी निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून बच्चू कडू यांनी मंत्रिपदावरचा दावा सोडला. पण आता मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडू यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
मुंबई, 27 जुलै 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्तेत आल्यापासून प्रहारचे आमदार बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी वेळोवेळी ती बोलूनही दाखवली आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असेलेल्या बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी मोठी निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून बच्चू कडू यांनी मंत्रिपदावरचा दावा सोडला. पण आता मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, “माझं काय होईल म्हणून चिंता करु नका. बच्चू कडू हा बच्चू कडू म्हणून काफी आहे. आमदार, मंत्री असो नसो. मला चिंता नाही. मी स्वत: मंत्रीपद नाकारलं. त्यामुळे तो विषय संपला. ज्यादिवशी विस्तार होईल त्यादिवशी मी अमेरिकेत जावून बसणार आहे.”
Published on: Jul 27, 2023 07:25 AM
Latest Videos