सध्याचं परिवर्तन आम्हालाही धक्काच होता, राष्ट्रवादीच्या बंडावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

“सध्याचं परिवर्तन आम्हालाही धक्काच होता”, राष्ट्रवादीच्या बंडावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

| Updated on: Jul 05, 2023 | 8:03 AM

राज्यात शिवसेनेच्या बंडाला वर्षपूर्तीच होताच अजित पवार आपल्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. या युतीमुळे पुन्हा एकदा राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहे. या घडामोडींवर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: राज्यात शिवसेनेच्या बंडाला वर्षपूर्तीच होताच अजित पवार आपल्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. या युतीमुळे पुन्हा एकदा राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहे. या घडामोडींवर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”माझ्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत हे पाच वर्षे महत्त्वाचे ठरले. नाराजी करून फायदा काय. कधी नाराजी करायची आणि कधी नाराजी करायची नाही, हे सर्व आमदारांना माहीत असते. आता नाराजी करून काही फायदा नाही. जसं आहे तसं समजून घ्यायचं आनंदीत राहायचं.शिंदे-भाजप आणि राष्ट्रवादीचा एक गट हे सर्व एकत्र येणं हे आम्हाला पचणे कठीण झाले. लोकांना पचायला वेळ लागेल. बाप मेला तरी बेहत्तर. नेता जिवंत राहिला पाहिजे, असे लोकांची मानसिकता असते. रेग्यूलर जेवण असलं तर पचायला सोपं जातं. आता ताटचं बदललं आहे, हे पचायला लोकांना जड जाईल,” असं बच्चू कडू म्हणाले.

Published on: Jul 05, 2023 08:03 AM