निकृष्ट जेवण पाहून बच्चू कडू भडकले, आचाऱ्याच्या थेट कानशिलात लगावली

| Updated on: Apr 06, 2021 | 8:30 PM

निकृष्ट जेवण पाहून बच्चू कडू भडकले, आचाऱ्याच्या थेट कानशिलात लगावली (bacchu kadu slaps chef)

अकोला : राज्याचे जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार, महिला व बालकल्याण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचं पुन्हा एकदा रौद्ररुप पाहायला मिळालंय. अकोल्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी असणाऱ्या बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील जेवणाची व्यवस्थाही पाहिली. मात्र, सर्वच रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याचा प्रकार समोर आला. यामुळे संतापलेल्या बच्चू कडू यांनी सर्वांसमोर तेथे उपस्थित आचाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे

 

Published on: Apr 06, 2021 08:29 PM