...म्हणून मी एकनाथ शिंदे यांचा आयुष्यभर गुलाम बनून राहीन, बच्चू कडू यांनी मानले आभार

“…म्हणून मी एकनाथ शिंदे यांचा आयुष्यभर गुलाम बनून राहीन”, बच्चू कडू यांनी मानले आभार

| Updated on: Jul 13, 2023 | 1:53 PM

अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचे आभार मानले आहेत.

अमरावती : अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, “मला महाविकास आघाडीत मंत्रिपद दिल्याने मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो.आम्हाला उद्धव ठाकरेंनी मंत्रीपद दिलं. त्यांच्यासाठी आम्ही योगदान दिलं. उद्धव ठाकरे यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं असतं तर गुवाहाटीला जाण्याची वेळ आली नसती. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं. त्यामुळे आम्ही आयुष्यभर त्याचे गुलाम बनून राहू.”

Published on: Jul 13, 2023 01:53 PM