“महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना आडवं पाडलं पाहिजे”; बच्चू कडू यांची संभाजी भिडे यांच्यावर टीका
भिडे गुरुजी असो किंवा कोणीही महापुरुषांचा अपमान केला तर त्यांना आडवं घेतलं पाहिजे. भिडे गुरुजी स्वातंत्र्याबद्दल संशय निर्माण करत आहे, स्वातंत्र्याबाबत हे चुकीचं आहे.
नागपूर, 02 ऑगस्ट 2023 | शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली. त्यामुळे त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.त्यांच्यावर चौफेर टीका सुरु आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन सुरु आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात, अटकेची कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अशातच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “कुठल्याही महापुरुषांबाबत वक्तव्य करणं योग्य नाही. राहुलजी सावरकरांबद्दल पुरावे घेऊन बोलले, भिडे यांनी महात्मा गांधीबद्दल बोलले हे निंदनीय आहे. कोणीही असू द्या, भिडे गुरुजी असो की कुणी असं बोललं तर त्यांना आडवं घेतलं पाहिजे. भिडे गुरुजी स्वातंत्र्याबद्दल संशय निर्माण करत आहे, स्वातंत्र्याबाबत हे चुकीचं आहे.”