बच्चू कडू यांच्या स्मित हास्यामागचं नेमकं कारण काय? पाहा व्हिडीओ…
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान आज प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच गाडीतून वर्षा ते विधान भवनच्या दिशेने रवाना झाले. एकाच गाडीने प्रवास केल्यामुळे बच्चू कडू यांची नाराजी दूर झाली का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
मुंबई, 17 जुलै 2023 | राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान आज प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच गाडीतून वर्षा ते विधान भवनच्या दिशेने रवाना झाले होते. मंत्री पदाच्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार असल्याचं आमदार बच्चू कडूंनी सांगितले होते. एकाच गाडीतून प्रवास केल्यानंतर बच्चू कडू यांची नाराजी दूर झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र “मी मुख्यमंत्र्यांसोबत गाडीत बसून जरी आलो असलो, तरी आमची मंत्री पदाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. मी नाराजही नाही,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
Published on: Jul 17, 2023 01:42 PM
Latest Videos