“अजित पवार यांना अर्थखातं देण्यास शिवसेनेच्या आमदारांचा विरोध”, असं का म्हणाले बच्चू कडू?
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या आठ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या एन्ट्रीवरून शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती.
नागपूर : राष्ट्रवादीत बंडखोरी करत अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या आठ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या एन्ट्रीवरून शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. ते म्हणाले की, “सध्या तीन इंजिन एकत्र आले आहेत. ते मजबूत होऊ शकतात नाही तर त्यामध्ये बिघाड देखील होऊ शकतो. या तिन्ही इंजिनमध्ये बिघाड होऊ नये म्हणून बैठकी सुरू आहेत. मला कुठल्याही मंत्री पदाची अपेक्षा नाही. अपेक्षा ठेवून मी कधी चालत नाही. मला जे मंत्रिपद मिळेल ते मी स्वीकारेल.अजितदादा गट आल्यानंतर नाराजी होणारच. कारण प्रत्येकाची आपापली वेगवेगळी अपेक्षा आहे. काही आमदारांना वाटतं अर्थ खात अजित पवारांकडे जाऊ नये. अजित पवारांकडं अर्थ खात गेलं तर ते राष्ट्रवादीला जास्त निधी देतील इतरांना कमी निधी देतील. त्यांच्याकडे अर्थ खात गेलं तर हा भेदभाव होत राहील. त्यामुळे अर्थ खात अजित पवारांकडे जाऊ नये, असं सर्वांचं म्हणणं आहे. मंत्रिमंडळानंतर आमदारांची नाराजी दूर करणं मोठं चॅलेंज असणार आहे. म्हणजे ही एक प्रकारची कसरतच असेल. कारण बऱ्याच आमदारांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे. आमच्या घासातला घास खायला राष्ट्रवादी सत्तेत आल्या नाराजी होणारच.”