उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि आमचं अडीच वर्ष…; बच्चू कडूंची टीका
बच्चू कडू यांनी मविआच्या अडीच वर्षाच्या प्रवासाबद्दल सांगताना, मविआच्या सरकारमध्ये माझा ही सहभाग होता. मी त्यात मंत्री होतो. आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा साक्षात्कार झाला आणि आमची अडीच वर्ष वाया गेली.
ठाणे : प्रहार पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू हे आपल्या स्पष्टपणासाठी ओळखले जातात. यावेळी ही त्यांनी काहीही मनात न ठेवता आपली खदखद बोलून दाखवली. त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडीचे तक्तालिन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. तसेच त्यांच्यावर उपहासात्मक टीका देकिल केली.
बच्चू कडू यांनी मविआच्या अडीच वर्षाच्या प्रवासाबद्दल सांगताना, मविआच्या सरकारमध्ये माझा ही सहभाग होता. मी त्यात मंत्री होतो. आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा साक्षात्कार झाला आणि आमची अडीच वर्ष वाया गेली.
मविच्या काळात कोरोना होता आणि ठाकरे चांगल्या, मोठ्या गतीने काम करत होते. पण आता शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. आणि सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्यामुळे आज दिव्यांगासाठी पहिलं मंत्रालय या देशात उभ राहिलं. त्यामुळे दिव्यांगाच्या विकासाचा आता एक टप्पा पुर्ण झाला आहे. अजून दोन टप्पे बाकी आहेत.