Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachchu Kadu : बच्चू कडुंचं उद्यापासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन

Bachchu Kadu : बच्चू कडुंचं उद्यापासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन

| Updated on: Mar 20, 2025 | 2:02 PM

Bachchu Kadu On Mahayuti : बच्चू कडू यांनी आज महायुती सरकारची तुलना औरंगजेबाशी केलेली बघायला मिळाली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कडू आज आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी उद्यापासून 3 दिवस अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचं सांगितलं.

सरकारला सांगायचं आहे की, हिंदू शेतकऱ्यालासुद्धा पोट असतं. तो उपाशी आहे. तलवारीने जेवढे मारले जातात त्यापेक्षा धोरणाने किती मेले? जेवढे औरंगजेबाने नाही मारले तेवढे सरकारने मारले आहेत. एवढी मारामारी जर धोरणामुळे होत असेल तर हे औरंगजेबाचं कृत्य थांबवणारं कोणी कुठं जन्माला येईल का? याचा विचार आम्ही करत हे, अशी खरमरीत टीका प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू उद्यापासून 3 दिवस अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहेत. याबद्दलची माहिती त्यांनी आज विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांची तुलना औरंगजेबाशी केलेली बघायला मिळाली.

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, निवडणुकीच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं म्हंटलं होतं. पण आता ते आश्वासन फॉल ठरलं आहे. प्रभू रामचंद्राची शपथ मोडली गेली. रामराज्य आलं पण देवेंद्रजींनी शपथ मोडली. त्यामुळे मी उद्यापासून 21 ते 23 पर्यंत रायगडच्या पायथ्याशी पातळ या गावी जिजाऊंच्या समाधीजवळ अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे. इथून शक्ती घेऊन महाशक्तीत आम्ही दिव्यांग, शेतकरी यांच्यासाठी आम्ही लढणार आहे, असंही यावेळी बच्चू कडू म्हणाले.

Published on: Mar 20, 2025 02:02 PM