निधी वाटपाच्या काँग्रेसच्या आरोपावर बच्चू कडू यांचा टोला, ‘जशी करणी, तसं फळ’
यावेळी त्यांनी शिंदे गटासह अजित पवार गट आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या आमदारांना भरघोस निधी दिला. मात्र त्यांनी शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांना निधी दिला नाही. यावरून काँग्रेसकडून टीका केली गेली.
नागपूर, 02 ऑगस्ट 2023 | शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या अर्थमंत्रालयाच्या चाव्या आपल्या हातात उपमुख्यंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घेताच निधी वापक केलं. मात्र यावेळी त्यांनी शिंदे गटासह अजित पवार गट आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या आमदारांना भरघोस निधी दिला. मात्र त्यांनी शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांना निधी दिला नाही. यावरून काँग्रेसकडून टीका केली गेली. यावरून प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. यावेळी कडू यांनी, काँग्रेस निधीवाटपात भेदभाव झाला असा आरोप करत आहे. मात्र त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांनी तसंच केलं.. जशी करणी तसं फळ भेटते असा टोला लगावला आहे. तर निधी वाटपाबद्दल आलेल्या बातम्या खोट्या आहेत. ज्या बातम्या आले त्याला आधार नव्हता. तर निधी वाटप बरा झालाय. काँग्रेस आमदारांना निधी कशाला देणार. जे सत्तेत असेल त्याला निधी देणार. थोडा थोडा निधी देणार असेही त्यांनी म्हटलं आहे.