एनडीएच्या बैठकीला बच्चू कडू जाणार; मांडणार ‘हे’ महत्वाचे मुद्दे
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनादरम्यान प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
मुंबई, 17 जुलै 2023 | राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनादरम्यान प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, शेतकरी, दिव्यांग बांधव, तळागाळातील कामगार यांच्यासंबंधित आम्ही या अधिवेशनात आवाज उठवणार आहोत. तसेच मी दिल्ली येथे होणाऱ्या एनडीएच्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहे. या बैठीक आम्ही आमचे महत्वाचे मुद्दे मांडणार आहोत. बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरही भाष्य केलं आहे. ते नेमकं काय म्हणाले यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
Published on: Jul 17, 2023 02:01 PM
Latest Videos