समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र कायम, मृत्यूचं एकच मोठं कारण आलं समोर; बघा कोणतं
VIDEO | शिर्डी ते नागपूर असा सुरू झालेल्या समृद्धी महामार्गावरून तुम्ही प्रवास करताय? जरा जपून... हा व्हिडीओ तुम्ही बघाच
औरंगाबाद : नव्याने सुरू झालेल्या समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनं सुसाट पद्धतीने धावताय. मात्र शिर्डी ते नागपूर असा सुरू झालेल्या समृद्धी महामार्गावर खराब आणि घासलेल्या टायरमुळे अपघातांचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. खराब टायर फाटून, फुटून आणि घासल्यामुळे अनेक अपघात या समृद्धी महामार्गावर होऊ लागलेले आहेत. यामध्ये काही लोक जखमी होत आहेत तर काहीजणांचा मृत्यू सुद्धा होताना दिसतोय. त्यामुळे खराब टायर वापरू नयेत, असे आवाहन सातत्याने केलं जात आहे तरीही बेफिकीरपणे खराब टायर वापरणं सुरूच आहे. यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसत आहे.
Published on: Apr 18, 2023 10:30 AM