हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक! औरंगाबादमध्ये आषाढीला बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय
अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे यंदा याच दिवशी बकरी ईद सुद्धा आहे. मात्र औरंगबादमध्ये आषाढीला बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.
औरंगाबाद : अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे यंदा याच दिवशी बकरी ईद सुद्धा आहे. मात्र औरंगबादमध्ये आषाढीला बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं उदाहरण प्रतिपंढरपूरमध्ये दिसून आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील प्रति पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुस्लिम बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीत आषाढी एकादशीला बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकच दिवशी आहे. आषाढी आणि बकरी ईद दोन्ही मोठे सण आहेत. वारकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी मुस्लिम बांधव बकरी ईद दुसऱ्या दिवशी साजरी करणार आहेत.
Published on: Jun 22, 2023 03:48 PM
Latest Videos