Bala Nandgaonkar | ‘हिंदूच रक्षण आता एकच व्यक्ती करु शकतो, ते म्हणजे राज ठाकरे’ बाळा नांदगावकर यांचा दावा
Bala Nandgaonkar | देशात हिंदूचे रक्षण आता एकच व्यक्ती करु शकते, ती म्हणजे राज ठाकरे, असा दावा बाळा नांदगावकर यांनी केला आहे.
Bala Nandgaonkar | देशात हिंदूचे रक्षण आता एकच व्यक्ती करु शकते, ती म्हणजे राज ठाकरे (Raj Thackeray), असा दावा मनसे (MNS) नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केला आहे. त्यामुळे मनसे दोन टॅगलाईनसह उतरली आहे. हिंदू रक्षक आणि मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, ही दोन नारे मनसेने सांगितले आहेत. मनसेने पक्ष बळकट करण्यासाठी राज्यभर नोंदणी अभियान सुरु केले आहे. आता पक्षाने हिंदू विचारांची पाठराखण सुरु केली असून त्यानुसार तरुण-तरुणींसह जनतेला पक्ष नोंदणी अभियानात (registration campaign) नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच पुण्यात आज, हिंदूंचा हिंदूस्थान अशी बँनर चौकाचौकात झळकली. त्यात आता भारत नाही, असा संदेश ही देण्यात आला आहे. मनसेने भारत नाव नाकरत हिंदूंचा हिंदूस्थान असा नवा नारा दिला आहे. मनसेने मुंबईतून सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे.