Shivsena : विजय शिवतारेंच्या शिवसेनेतून जाण्यानं काहीही फरक पडणार नाही, ते निष्ठावंत शिवसैनिक कधी नव्हतेच; चांदेरेंची टीका
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवतारेंना जागा त्यांची दाखवू, असे चांदेरे म्हणाले. तसेच विजय शिवतारे सच्चे शिवसैनिक कधी नव्हतेच. त्यांच्या शिवसेनेतून जाण्यामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नसल्याचे चांदेरे म्हणाले.
विजय शिवतारेंच्या (Vijay Shivtare) जाण्याने शिवसेनेला काही फरक पडणार नाही. पुढच्या वेळेस विजय शिवतारे आमदार होणार नाहीत, असे शिवसेना पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चांदेरे (Balasaheb Chandere) म्हणाले आहेत. शिवतारेंवर त्यांनी टीका केली आहे. त्यांनी फक्त एक पंचायत समिती, जिल्हा परिषद पुढच्या वेळेस निवडून आणावी, मी आव्हान देतो, असे बाळासाहेब चांदेरे म्हणाले. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. 2021मध्ये त्यांनी नवीन पक्ष नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज पाठवला होता. तेव्हाच त्यांनी पक्षाशी गद्दारी केली होती. यासंबंधीचा पुरावाही बाळासाहेब चांदेरेंनी दाखवला. दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवतारेंना जागा त्यांची दाखवू, असे चांदेरे म्हणाले. तसेच विजय शिवतारे सच्चे शिवसैनिक (Shivsainik) कधी नव्हतेच. त्यांच्या शिवसेनेतून जाण्यामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नसल्याचे चांदेरे म्हणाले.

सकारात्मक चर्चेची संधी होती, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

संतोष देशमुखांच्या 3 तासांच्या अमानुष मारहाणीचे 15 व्हिडिओ, 8 फोटो

वाल्मिक कराडचे धमकीचे फोन रेकॉर्ड आले समोर, अडचणी वाढणार

मुंबईत राजकीय पक्षाच्या कार्यालयात जंगी पार्टी..
