“आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे, आम्ही शरद पवार यांच्यासोबत”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासह राष्ट्रवादीचे 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या संपूर्ण घटनेनंतर अॅक्शनमोडमद्धे आले आहेत.
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासह राष्ट्रवादीचे 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या संपूर्ण घटनेनंतर अॅक्शनमोडमद्धे आले आहेत. आज शरद पवार कराडमध्ये दाखल झाले. शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ असलेल्या प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जमलेले कार्यकर्ते आणि नागरीकांना संबोधित केलं. शरद पवार यांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते यावेळी जमले. कराड मधील शरद पवार यांच्या दौऱ्याचं संपूर्ण नियोजन बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. यावेळी “त्यांनी आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे असल्याने शरद पवारांसोबत असल्याचं” म्हटलं आहे.
Published on: Jul 03, 2023 12:46 PM
Latest Videos