राऊत यांचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले, भाजपने मोठा सौदा केला
या देशातील एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी संपूर्ण भाजप हा कसा कामाला लागला आहे हे पहायला मिळत आहे. जे इतिहासात कधी घडलं नव्हतं
मुंबई : देशात सध्या जे फुटीचे राजकारण केलं जात आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली गेली. यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. तर हे सगळ फक्त या देशातील एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी भाजपकडून केलं जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
दिल्ली महापौर पदाची निवडणूक, दिल्लीचा अर्थसंकल्प हा भाजपने रोखला, यासह अनेक गोष्टी या भाजपने केल्या ज्या पहायला मिळत आहेत. ज्या इतिहासात कधी घडलेल्या नाहीत. या देशातील एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी संपूर्ण भाजप हा कसा कामाला लागला आहे हे पहायला मिळत आहे. जे इतिहासात कधी घडलं नव्हतं. तर बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना ही फक्त भाजपला कोणालातरी विकत द्यायची आहे म्हणून तिचा फार मोठा सौदा केला जातोय. शिवसेना ही निवडणूक आयोगाचा वापर करून एका फुटलेल्या गटाच्या हाती दिली जाते, हे सुद्धा इतिहासात कधी घडलं नव्हतं, अशीही टीका भाजपवर केली आहे.