Nana Patole News | बाळासाहेब ठाकरेंचा विचार कायम राहिला पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका, नाना पटोले यांचे मोठं वक्तव्य
Nana Patole News | बाळासाहेब ठाकरेंचा विचार कायम राहिला पाहिजे, हीच काँग्रेसची भूमिका असल्याचे मोठे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
Nana Patole News | बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thakeray) यांचा विचार कायम राहिला पाहिजे, हीच काँग्रेसची (Congress Party) भूमिका असल्याचे मोठे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. ज्या विचाराने शिवसेना (Shivsena) स्थापन झाली, त्यामुळे लोकांनी शिवसेनेवर अलोट प्रेम केले. शिवसेनेला डोक्यावर घेतलं. त्यामुळे हा विचार टिकला पाहिजे असे ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष (Bhartiya Janta Party) शिवसेना संपवायला निघाला आहे. शिंदे गटाला हाताशी धरुन त्या गटाला ताकद देण्याचा प्रयत्न भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सुरु केला आहे असा आरोप करत पटोले यांनी हे जे राजकारणा सुरु आहे, ते भयावह असल्याचा आरोप केला. सध्या उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका मांडली, त्या भूमिकेला राज्यातून ताकद मिळावी, हीच काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील भाजपचे नेते कायम उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वाईट बोलत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आजारपणात आपल्याविरुद्ध कट कारस्थान रचल्याचा आरोप योग्य असल्याचे पटोले यांनी सांगितले.