संजय राऊत यांनी राष्ट्रवादी फोडली? बाळासाहेब थोरात म्हणतात, त्यांचा दोष...

संजय राऊत यांनी राष्ट्रवादी फोडली? बाळासाहेब थोरात म्हणतात, “त्यांचा दोष…”

| Updated on: Jul 04, 2023 | 12:13 PM

महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा आरोप हा संजय राऊत यांच्यावर केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की...

मुंबई: 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली. एक वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून या महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला. तर, अजित पवार यांच्या रूपाने दुसरा धक्का बसला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही फोडल्याचं खापर संजय राऊत यांच्यावर फोडले जात आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरून संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र झोडले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थारोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हा सर्व प्रचाराचा भाग आहे. खासदार संजय राऊत यांचा यात काही दोष नाही. ते त्यांची बाजू मांडत असतात. मात्र त्यांच्या विरोधत जे आहेत त्यांना संजय राऊत सहन होत नाही म्हणून ते असे आरोप करत असतात.

 

 

Published on: Jul 04, 2023 12:13 PM