Balasaheb Throat | पुरामुळे नुकसान झालेल्या भागाचे अद्याप पंचनामे झाले नाहीत, बाळासाहेब थोरात यांचा आरोप

Balasaheb Throat | पुरामुळे नुकसान झालेल्या भागाचे अद्याप पंचनामे झाले नाहीत, बाळासाहेब थोरात यांचा आरोप

| Updated on: Aug 05, 2022 | 3:37 PM

Balasaheb Throat | अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यावर संकट कोसळलेले असताना अद्याप पंचनामे सुद्धा झालेले नसल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

Balasaheb Throat | अतिवृष्टी आणि पुरामुळे (flood damaged areas)राज्यावर संकट कोसळलेले असताना अद्याप पंचनामे सुद्धा झालेले नसल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Throat)यांनी केली आहे. राज्य सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात नाही. पंचनामे होत नाही. यंत्रणा पोहचत नाही. मग शेतकऱ्यांना (Farmer Help) मदत कधी पोहचवणार असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला. यांचं एकच मिशन सध्या सुरु आहे, दिल्ली वारीचं, पण त्यांच्याकडून अजून मंत्रीमंडळ स्थापन करणे होत नाही. राज्यात आपत्ती कोसळली आहे, पण सरकारला त्याचे काहीऐक देणेघेणे नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडण्याचा, त्यांच्या समस्या मांडण्याचा अधिकार विरोधी पक्षाचा असल्याची आठवण त्यांनी सरकारला करुन दिली. तसेच आंदोलन होऊ देऊ नका यासाठी पोलीस यंत्रणेला वरतून फोन आल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला.