बाळासाहेबांचे नाव कुणालाही वापरता येणार नाही; शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला प्रस्ताव
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackrey) आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही असा प्रस्ताव शिवसेना निवडणूक आयोगाला देणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतसुद्धा बाळासाहेबांचं नाव कुणी वापरू नये असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. हिंमत असेल तर तुम्ही तुमच्या बापाच्या नावावर मतं मागा असेही त्यांनी ठणकावले होते. नावाचा चुकीचा वापर होऊ नये यासाठी शिवसेना निवडणूक आयोगाला प्रस्ताव […]
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackrey) आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही असा प्रस्ताव शिवसेना निवडणूक आयोगाला देणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतसुद्धा बाळासाहेबांचं नाव कुणी वापरू नये असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. हिंमत असेल तर तुम्ही तुमच्या बापाच्या नावावर मतं मागा असेही त्यांनी ठणकावले होते. नावाचा चुकीचा वापर होऊ नये यासाठी शिवसेना निवडणूक आयोगाला प्रस्ताव देणार असल्याचे वृत्त आहे. शिवसेना निखारा आहे पाय ठेवलं तर जाळून जाल असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर उद्धव ठाकरे यांनी आज आक्रमक पवित्र घेतला. बाळासाहेबांचं नाव न वापरता निवडून येऊन दाखवा असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
Published on: Jun 25, 2022 04:33 PM
Latest Videos