इर्शाळवाडी दुर्घटनेवर विधानसभेत चर्चा; बाळासाहेब थोरात म्हणाले, “विरोधी पक्षनेत्यांनाही सोबत…”
रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचे मृतृ झाला आहे. या दुर्घटनेवर आज विधानसभेत चर्चा झाली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अधिवेशनात यावर आपलं मत मांडलं.
मुंबई, 20 जुलै 2023 | रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचे मृतृ झाला आहे. तर ढिगाऱ्याखालून 75 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेवर आज विधिमंडळात चर्चा झाली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अधिवेशनात यावर आपलं मत मांडलं. थोरात म्हणाले की, “इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडते तेव्हा विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष एकत्र काम करतो. महाराष्ट्राची ही चांगली परंपरा आहे. ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळीच तिकडे गेले. तसेच, काही मंत्रीही गेले. पण, अशावेळी विरोधी पक्षनेत्यांनाही सोबत न्यायला हवे होते. सभागृहात माहिती देण्याआधी सरकारने विरोधी नेत्यांशी चर्चा करायला हवी होती. आमच्यामध्येही असे अनेकजण आहेत, ज्यांना अशा दुर्घटना हाताळण्याचा अनुभव आहे. त्याचा सरकारला फायदा होईल.”

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
